सोयगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील जंजाळा किल्ला डोंगर परिसरात आज एक गंभीर अपघात घडला. पाण्याचा टँकर घेऊन जाणारा ट्रॅक्टर डोंगराच्या उंच भागावरून सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरसह टँकरचा पूर्णपणे चुराडा झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोंगरावरील अरुंद व वळणदार रस्त्यावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुदैवाची बाब म्हणजे, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक व अन्य व्यक्ती वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील पंचनामा व तपास सुरू आहे.
या भागात रस्त्यांची अवस्था खराब असल्याने व डोंगराळ मार्ग धोकादायक असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सोयगाव मधील जंजाळा किल्ला परिसरात भीषण अपघात
Related Posts
Add A Comment

