छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने कार्यकारिणीची बैठक विभागीय कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीस संस्थापक अध्यक्ष मनोज गायके यांची प्रमुख उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी सुरेश जुये पाटील होते. ते म्हणाले हिंदवी स्वराज्य संघटना ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या महान विचारांचा वारसा जपत मराठा समाज व हिंदू समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करत आहे. आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या स्मृती जपून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. इतिहासातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा युवकांमध्ये जागवून त्यांना आदर्श, जबाबदार आणि संस्कारी नागरिक म्हणून घडवण्यासाठी संघटना विविध उपक्रम राबवत आहे. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या विचारांवर आधारित संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी ही संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे.
बैठकीदरम्यान जयंती उत्सवासाठी पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश साळुंके, कार्याध्यक्ष अजय गंडे, स्वागताध्यक्ष सतीश तवार, तर सरचिटणीसपदी ओंकार माळवतकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अनिल तुपे यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवाजी भिंगारे, अमोल पाटील, विशाल वेताळ, महेश चव्हाण, संदीप हरदे, दिलीप जाधव, राजेश जाधव, तुकाराम मोरे, अभिजित काकडे, अनिल वाघ, अमोल मते, रविंद्र गायके, गिरीष मारवाडे, विजय साखळे, कार्तिक फरकाडे, श्रीकांत गाडेकर, तात्याराव देवरे, अविनाश पोफळे, योगेश औताडे, विलास औताडे, संजय जाधव, प्रशांत सहाने, ऋषिकेश शेजुळ, प्रतीक सहाने, श्रीकांत ढवळे, आकाश गाडेकर, ज्ञानेश्वर मालोदे, कैलास साळुंके, रवींद्र कदम, वैभव सालपे, संतोष मोरे, सचिन गायकवाड, मंगेश सोनवणे, अक्षय लोंढे आदींचा सहभाग आहे.
या बैठकीत जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. ते अत्यंत पराक्रमी, विद्वान आणि धाडसी योद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध कठोर लढा देत स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेमुळे ते इतिहासात अजरामर झाले आहेत.
समिती अध्यक्ष गणेश साळुंके
कार्याध्यक्ष अजय गंडे
स्वागताध्यक्ष सतीश तवार
सरचिटणीस ओंकार माळवतकर


