छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर येथे गरवारे कम्युनिटी सेंटरच्या स्थापना दिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. Lions Clubs International अंतर्गत कार्यरत लायन्स नेत्र रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर आणि Garware Community Center यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: 5 मे 2026
वेळ: सकाळी 9:30 ते दुपारी 2:00
स्थळ: गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, सिडको,छत्रपती संभाजीनगर – 431003
या शिबिरामध्ये विद्यार्थी, पालक तसेच जेष्ठ नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये—
नेत्रतज्ज्ञांकडून सखोल तपासणी
डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन
डोळ्यांच्या आजारांचे वेळीच निदान “आपल्या डोळ्यांचे आरोग्य जपा – या उपक्रमाचा नक्की लाभ घ्या!”
महत्वाच्या सूचना:
हे शिबिर वय 9 वर्षांवरील सर्वांसाठी खुले आहे
सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे
तपासणी First Come, First Serve पद्धतीने होईल
जेष्ठ नागरिकांनी पूर्व वैद्यकीय नोंदी (History File) सोबत आणाव्यात
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: 9922400428
नोंदणीसाठी प्रत्यक्ष गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, सिडको येथे संपर्क साधावा
हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक उत्तम संधी असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

