छत्रपती संभाजीनगर ( महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी):
भव्य स्वागत रॅलीचे आयोजन
शिवसेना नेते व मा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर नगरीत आगमन होत असून त्यांच्या स्वागतासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली बुधवार, दि. 06 मे
2026 रोजी सायंकाळी 06 वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक येथून सुरू होऊन क्रांती चौक येथे समाप्त होणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक सहभागी होणार असल्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शहरप्रमुख डॉ. बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरीभाऊ हिवाळे आणि दिग्विजय शेरखाने यांनी केले आहे.
अंबादास दानवे यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर : भव्य स्वागत रॅलीचे आयोजन
Related Posts
Add A Comment

