छत्रपती संभाजीनगर | दि. ०४ मे
शहरातील पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षांचे आयुष्य वाढविण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मा. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व मुख्य उद्यान अधिक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून “खिळे मुक्त झाडं… वेदना मुक्त निसर्ग” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
झाडांना होत असलेली हानी
शहरातील अनेक रस्त्यांवर झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक, बोर्ड आणि लायटिंग लावली जात असल्याचे आढळून आले आहे. तसेच इंटरनेट वायर, सर्विस केबल्स टाकल्यामुळे झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
खिळ्यांमुळे झाडांना किड लागून ते आतून कमजोर होतात
झाडांची वाढ खुंटते
वादळी वाऱ्यात झाडे पडण्याचा धोका वाढतो
सिरीयल लाईट्समुळे उष्णता वाढून झाडे आणि पक्ष्यांवर परिणाम
मोहिमेची सुरुवात
या मोहिमेद्वारे आतापर्यंत सुमारे १५० झाडांना खिळे आणि तारांपासून मुक्त करण्यात आले आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
खालील कायद्यांनुसार झाडांना इजा करणे हा दंडनीय गुन्हा आहे:
महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५
महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५
या अंतर्गत संबंधित व्यक्ती, संस्था, व्यापारी आणि जाहिरातदारांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई होऊ शकते.
७ दिवसांची मुदत
प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की: झाडांवर लावलेले खिळे, बोर्ड, केबल्स ७ दिवसांत स्वतः काढून टाका
अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल
नागरिकांना आवाहन
शहर हिरवेगार व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण टाळावे आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरात झाडांना इजा कराल तर कारवाईला सामोरे जा – प्रशासनाचा इशारा
Related Posts
Add A Comment

