छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) – येथील EPS-95 निवृत्तीवेतनधारकांसाठी EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती यांच्या वतीने भव्य दिव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता वंजारी भवन, पुंडलिक नगर पाण्याच्या टाकीसमोर, हनुमान नगर, सिडको येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कमांडर अशोक राऊत भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून खासदार संदिपान भुमरे पाटील व डॉ. कल्याणराव काळे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून महापौर समीर राजूरकर व उपमहापौर राजेंद्र जंजाळ उपस्थित राहतील.
याशिवाय नगरसेवक मनोज गांगवे, प्रमोद राठोड आणि अशोक दामले हे विशिष्ट अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
EPS-95 निवृत्तीवेतनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्या, पेन्शनवाढ, तसेच सामाजिक सुरक्षेबाबत या मेळाव्यात सविस्तर चर्चा होणार असून मोठ्या संख्येने निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे निवेदक म्हणून कमलाकर पांगारकर (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र) व चंद्रकांत कांबळे (जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर) तसेच समितीचे सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
EPS-95 निवृत्तीवेतनधारकांचा छत्रपती संभाजीनगरात भव्य महामेळावा उद्या
Related Posts
Add A Comment

