छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महानगरपालिकेच्या हद्दीत पूर्व पावसाळी हंगामातील वादळी वाऱ्यामुळे परिसरातील ,मुख्य रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी जीर्ण,वाळलेली , किड लागलेली वृक्ष उन्मळून पडणे ,वृक्षाच्या फांद्या तुटणे यामुळे जीवित वा वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगाने मा.आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व मुख्य उद्यान अधिक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झोन निहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशा अनुचित घटना घडू नये यासाठी प्रथमदर्शनी जीर्ण ,वाळलेली , किड लागलेली झाडे नागरिकांच्या निर्दशनास आल्यास अशा झाडांची माहिती उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग ,सिद्धार्थ उद्यान येथे लेखी स्वरूपात द्यावी .जेणे करून विभागाकडून उचित कार्यवाही करण्यात येईल.तसेच नागरिकांना अधिक माहितीसाठी खाली नमूद कर्मचारी यांचेशी संपर्क साधता येईल व आपली माहिती नोंदविता येईल.
प्रभाग क्रं.१ ते ०६
नानासाहेब पठाडे ,उद्यान सहायक
७९७२४०९४५३
प्रभाग ७ ते १०
शेख जाफर दस्तगीर,उद्यान सहायक ९४०३१४०७९१
प्रभाग क्र.१,२,३
सतीश आळंजकर , क.कृषि सहायक ९४२३०३२५०१
सचिन उजागरे क.कृषी सहायक ९६६५५२०५५५
प्रभाग क्र.४,५,६
पवनकुमार शिराम क.कृषी सहायक ७३५०९७६७५५
राहुल साळवे , क.कृषी सहायक ९४२१६७८४१९
प्रभाग क्रमांक.७,८,९,१०
किशोर शिंदे क.कृषी सहायक
९६०४६७११७४
जीवन दुबे . क.कृषी सहायक
८९९९६१२५८२
आनुद साळवे , क.कृषी सहायक ८९८३२३१५४८




