छत्रपती संभाजीनगर, दि. ३ (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) – जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून नागरिकांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. ३०) आयोजित आढावा बैठकीत या मोहिमेचा आढावा घेण्यात आला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार मॅपिंगच्या कामाला गती मिळाली आहे. ३० एप्रिल २०२६ पर्यंत एकूण ३२,४७,०९४ मतदारांपैकी २४,१६,६१८ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून एकूण प्रगती ७४.४२ टक्के नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान, शहरी मतदारसंघांमध्ये मॅपिंगचे प्रमाण तुलनेने कमी असून ते सध्या ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान आहे. या पार्श्वभूमीवर १०५-फुलंब्री, १०७-औरंगाबाद मध्य, १०८-औरंगाबाद पश्चिम आणि १०९-औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत संबंधित BLO व पर्यवेक्षकांना कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. १० मे २०२६ पर्यंत किमान ९० टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांचा सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातील मतदार मॅपिंग हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक होण्यास मदत होते. तसेच स्थलांतरित, मृत किंवा अनुपलब्ध मतदारांची नोंद सुधारता येते आणि पात्र नागरिकांची नावे यादीत समाविष्ट होतात.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, BLO घरी आल्यास त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे व मतदार यादीतील आपला तपशील तपासून मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
Related Posts
Add A Comment

