छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):
नायगव्हाण परिसरात सिल्लोड–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा भरधाव हायवा दुभाजकावर आदळल्याची घटना घडली. ही घटना गणपती मंदिराजवळील पुलाजवळ घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हायवा अवैध वाळू वाहतूक करत होता. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाळू सांडली. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने ही वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत घडली असून, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. परिसरात अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढत असूनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महामार्गावर अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अवैध वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर: नायगव्हाण येथे अवैध वाळू वाहतुकीचा हायवा दुभाजकावर आदळला; जीवितहानी टळली
Related Posts
Add A Comment

