छत्रपती संभाजीनगर शहरातील करदात्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापौर समीर राजूरकर यांच्या सूचनेनुसार मालमत्ता करातील १०% सवलतीची मुदत आता ३१ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयुक्त अमोल येडगे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कर विभागाला दिले आहेत.
महापालिकेकडून एप्रिल महिन्यात मालमत्ता कराच्या सामान्य करावर १०% सूट जाहीर करण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ३१ हजार मालमत्ताधारकांनी एप्रिलमध्ये तब्बल २९ कोटी ४० लाख रुपयांचा कर भरला आहे. शहरातील एकूण ३.८२ लाख मालमत्तांपैकी मोठ्या संख्येने कर भरणा झाल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, नागरिकांकडून सवलतीची मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महापौर समीर राजूरकर यांनी सकारात्मक निर्णय घेत ही मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्याच्या सूचना दिल्या.
उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “करदात्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि वेळेत मालमत्ता कर भरून शहर विकासात योगदान द्यावे.”
सध्या “माझा कर, माझी जबाबदारी” ही कर आकारणी मोहीम सुरू असून, कर भरणाऱ्या नागरिकांना १०% सवलत दिली जात आहे. यासाठी महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत.
आयुक्त अमोल येडगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपल्या मालमत्तेची कर आकारणी करून शहराच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवा.”
👉 नागरिकांनी ३१ मेपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मालमत्ता करात १०% सूटला ३१ मेपर्यंत मुदतवाढ
Related Posts
Add A Comment

