छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
दि. ०२ मे —
स्थायी समिती सभापती माननीय श्री अनिल मकरिये यांच्या सूचनेनुसार तसेच विशेष प्रयत्नातून क्रांती चौक ते संभाजीपेठ या मार्गावर महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून नवीन सिटी बस सेवा सुरू करण्यात आली.
यावेळी माननीय महापौर श्री समीर राजूरकर, माननीय उपमहापौर श्री राजेंद्र जंजाळ, माननीय विरोधी पक्षनेते श्री अब्दुल समीर साजिद, गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती श्री जालिंदर शेंडगे, सन्माननीय नगरसेविका सौ. कीर्ती शिंदे तसेच कार्यकारी अभियंता श्री अमोल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिटी बसचे उद्घाटन करण्यात आले.
सदर बस सेवा रेल्वे स्टेशन, क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठण गेट, गुलमंडी, संभाजीपेठ, खडकेश्वर, मिल कॉर्नर आणि विद्यापीठ या महत्त्वाच्या मार्गांवर धावणार असून, शहरातील नागरिकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, नागरिकांना परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
क्रांती चौक ते संभाजीपेठ मार्गाने गुलमंडी वरून सिटी बस सेवेला प्रारंभ
Related Posts
Add A Comment

