छत्रपती संभाजीनगर, दि १(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस दलाने राष्ट्र्ध्वजास मानवंदना दिली.
अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) संगीता सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश शिंगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, अपर तहसीलदार उमेश पाटील, तहसीलदार पल्लवी लिगदे, रूपा चित्रक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

