छत्रपती संभाजीनगर, दि. १ मे (महाराष्ट्र न्यूज टाइम्स):
महाराष्ट्र दिन निमित्ताने छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र श्री सुजित महादेव पवार यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने गौरविण्यात आले. हा सन्मान मा. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री पवार यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने, प्रामाणिक सेवाभावाने आणि उल्लेखनीय कार्यामुळे हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव उंचावले असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या हातून अशीच देशसेवा सतत घडत राहो आणि भविष्यातही त्यांना अधिकाधिक सन्मान प्राप्त होत राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह विजेते सुजित पवार यांचा गौरव
Related Posts
Add A Comment

