प्रतिबंधात्मक आदेश
छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)दि.३०(जिमाका)- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी संगिता राठोड यांनी हे आदेश निर्गमित केले असून हे आदेश दि.१ मे ते १५ मे पर्यंत हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

