दि 30 एप्रिल:
छत्रपती संभाजीनगर महापौर समीर राजूरकर व आयुक्त अमोल येडगे यांच्या सुचने नुसार मालमत्ता करात एप्रिल महिन्यात १०% सूट मालमत्ता कराच्या सामान्य करात सूट देण्यात आली होती. या सूट चा फायदा घेत एप्रिल महिन्यात ३१ हजार मालमत्ता धारकानी २९ कोटी ४० लाख कर भरणा केला . तर ३.८२ लाख मालमत्तेचा भरणा केला .
शहरातील नागरिकांनी यांनी ही सूट आणखी वाढवल्यास कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी विनंती मा. महापौर समीर राजूरकर यांना केली होती त्यानुसार श्री राजूरकर यांनी ही मालमत्ता करातील १०% सूट ३१ मे २०२६ पर्यंत वाढवण्याच्या सूचना कर विभागाला दिल्या त्यानुसार ही १०% सूट आता ३१ मे पर्यंत लागू असेल.
शहरातील सर्व कर दात्यांनी या सूट चा फायदा घ्यावा व कर भरणा करावा असे आवाहन महापौर समीर राजूरकर व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे .
माझा कर माझी जबाबदारी ही मालमत्ता कर आकारणी मोहीम सध्या चालू असून यात कर आकारणी करणाऱ्या नागरिकांना ही मालमत्ता करात १०% सवलत देण्यात येत आहे . त्यासाठी सर्व झोन कार्यालय येथे हेल्प डेस्क उभारण्यात आले आहे . नागरिकांनी आपल्या मालमत्ता ना कर आकारनी करून शहर विकासात सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मालमत्ता करात १०% सूट ला ३१ मे पर्यंत मुदत वाढ
Related Posts
Add A Comment

