छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी | :ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर च्या कु.राजनंदिनी सोनाली मंगलसिंग पवार” या नुकत्याच ओडिसातील भुवनेश्वर येथे संपन्न झालेल्या ६१ व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत प्रथम उपविजेत्या ठरल्या असून या स्पर्धेतील यशानंतर त्यांचे आज शुक्रवारी (दि. १) प्रथमच शहरात सायंकाळी ६ वाजता आगमन होत असून क्रांती चौकात महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेनुसार त्यांचे भव्य स्वागत शहरवासियांच्या वतीने करण्यात येणार आहे.
जगावेगळे करण्याचे ध्येय ठेवून आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे धडपडणाऱ्या आणि तेव्हढ्याच ताकदीने स्वकर्तुत्वावर जिंकणाऱ्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरच्या लेक कु. राजनंदिनी सोनाली मंगलसिंग पवार यांनी यापूर्वी मुंबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत “फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र २०२६” हा मुकुट पटकावला असून हि छत्रपती संभाजी नगर, मराठवाडा, आणि महाराष्ट्राच्या शिरोपेचात मानाचा तुरा खोवणारी अभिमानाची बाब आहे. सौंदर्य स्पर्धेत राज्य, देश तसेच जागतिक पातळीवर छत्रपती संभाजी नगरच्या मुलीही सर्वात पुढे असल्याचे त्यांनी या स्पर्धेतून दाखवून दिले आहे. सौंदर्या बरोबरच बुद्धीमता आपला स्वभाव, शिक्षण, संस्कार आणि सामाजिक भूमिकाही जबाबदारीची असते हे त्यांनी आपल्या अंतिम फेरीतील प्रश्नोतरातून दाखवून दिले आहे.
६१ व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत प्रथम उपविजेत्या ठरल्या नंतर त्यांचे प्रथमच शहरात आगमन होत असून सायंकाळी ६ वाजता क्रांती चौकातील शिवरायांच्या आश्वारुढ स्मारकास राजनंदिनी पवार या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर शहरवासियांच्या वतीने त्यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार औक्षण करून फटाक्यांच्या आतशबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागत सोहळ्यास सर्व शहरवासियांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राजनंदिनी च्या आई सोनाली पवार, वडील मंगलसिंग पवार, व काका अभिजित देशमुख,भाऊ राजवर्धन पवार यांनी केले आहे.
मिडिया को-ओर्डीनेटर
सचिन लिला सुखदेव अंभोरे,
मो. 9970409640




