मनपा , एप्रिल 29: महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा , संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी व्हावी म्हणून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत गुणवत्तेची पंचसुत्री या उपक्रमात इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट स्टुडन्ट मुख्य परीक्षाचे आयोजन सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आलेली होती . या परीक्षेसाठी माहे नोव्हेंबर 2025 मध्ये जनरल नॉलेज, विज्ञान ,बुद्धिमत्ता ,गणित आणि इंग्रजी या विषयावर एक 1400 प्रश्नांची क्वेश्चन बँक इयत्ता सातवी मधील सर्व विद्यार्थ्यांना पुरविण्यात आली होती शिक्षक प्रत्येक दिवशी 15 प्रश्नांची तयारी करून घेत होते यासोबतच पालक सुद्धा आपल्या पाल्याची घरी तयारी करून घेत होते
या विद्यार्थ्यांची शाळा स्तरावर प्रथमतः चाळणी परीक्षा दिनांक 1/4/2026 रोजी घेण्यात आली होती.ही परीक्षा 1350 विद्यार्थिनी दिली होती
या परीक्षेमधून प्रत्येक शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या टॉप 10 टक्के गुणानुक्रमे 152 विद्यार्थी निवडले होते या 152 विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा चे आयोजन केले होते या मध्ये 95 विद्यार्थी मराठी व 57 विद्यार्थी उर्दू माध्यमाचे होते त्या पैकी सदर परीक्षा चे नियोजन हे राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षे सारखे केले होते प्रश्नपत्रिका ABCD अशा वेगवेगळ्या काढण्यात आल्या होत्या
या परीक्षेमधून टॉप 10 विद्यार्थी निवडले जाणार असून या विद्यार्थ्यांची नामांकित वैज्ञानिक संस्थांना इस्रो ISRO la भेट घडवून आणली जाणार आहे
या परीक्षेला माननीय अमोल येडगे आयुक्त यांनी भेट दिली
या परीक्षेचे नियोजन अंकुश पांढरे उप आयुक्त यांच्या यांनी मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी केले होते
परीक्षा यशस्वी होण्यासाठी इम्रान खान, अन्सारी फहोमोद्दीन,साकिब शेख , मनिषा सुरडकर ,सारिका थोरात व भीमा हिवराळे तसेच सतीश भाले आणि योगेश जडे यांनी प्रयत्न केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी- स्मार्ट स्टूडेंट मुख्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन
Related Posts
Add A Comment

