छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी
दि. 28 एप्रिल —
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयातील प्रशासकीय समिती सभागृहात आज नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास मा. महापौर श्री. समीर राजूरकर, मा. उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, मा. स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माननीय आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या हस्ते स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमाणपत्रांसोबतच स्वीकृत सदस्यांना महापालिकेची सेरेमोनियल कॅप, शाल जुट बॅग तसेच सभागृह कामकाज व नियमावलीवर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास मा. गटनेता (भाजप) श्री गोविंद केंद्रे, मा. गटनेता (शिव सेना शिंदे गट) श्री किशोर नागरे, मा गटनेता (एआयएमआयएम) श्री हाजी शेर खान आणि गटनेता (शिवसेना उबठा) श्री गणेश लोखंडे उप आयुक्त तथा नगरसचिव श्री नंदकिशोर भोंबे व इतर मान्यवर उपस्थित होते.





