आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मौजे निमखेडी ता. सोयगाव येथे अवैधरित्या लाकडाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मा. वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांना मिळाली त्यानंतर त्यांनी श्री एम एम अली वनपाल बनोटी , श्री एन. ए. मुलताने वनरक्षक वाडी, कु. एस. एस.चौधरी वनरक्षक घोसला यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. सदर ठिकाणी MH 18 BG 6941 नंबरची एक ट्रक लाकडाची अवैध वाहतूक करत असतांना आढळून आला. तद्नंतर वरील पथकाने रीतसर कायदेशीर कार्यवाही करून सदर वाहन व त्यातील माल जप्त केला. सदर कार्यवाही मा. श्रीमती माने मॅडम उपवनसंरक्षक (प्रा) छत्रपती संभाजी नगर तसेच मा. श्री. भामरे साहेब सहाय्यक वन संरक्षक सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव श्री. ए. पी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली . यावेळी श्री एम. एम.अली वनपाल बनोटी , श्री एन. ए. मुलताने वनरक्षक वाडी, कु. एस. एस.चौधरी वनरक्षक घोसला , मोहन चौधरी यांनी मिळून कार्यवाही केली.

