Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची धडक मोहीम सुरूच 2000 किलो पेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक केले जप्त, ₹50,000 रुपये ठोठावला दंड.
छत्रपती संभाजीनगर

प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची धडक मोहीम सुरूच 2000 किलो पेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक केले जप्त, ₹50,000 रुपये ठोठावला दंड.

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरूच असून शहरात विविध छोट्या मोठ्या प्लास्टिक व्यावसायिकांच्या दुकानांवर गोडाऊनवर धडक कारवाई मध्ये 2000 किलो पेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करून 50000 हजार रुपये केला दंड. शहरातील स्वास्तिक प्लास्टिक पुरुषोत्तम बाहेती, द्वारकाधीश ट्रेडर्स या नवीन मोंढा जाधववाडी या भागातील प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेत्यांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या तीन-चार दिवसा पासून चालू असलेल्या ह्या कारवाई मध्ये आतापर्यंत 13000 किलो पेक्षा जास्त प्लास्टिक केले जप्त आहे.

शहरात सुरू असलेल्या सततच्या छापेमारीमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणारी कठोर व सातत्यपूर्ण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, आज दिनांक 27/04/2026 रोजी पुन्हा एकदा बेकायदेशीर प्लास्टिक साठा करणाऱ्या विक्रेत्यांवर निर्णायक कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज शहरातील मध्यवर्ती नागरी मित्र पथकाद्वारे प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या ह्या कारवाई मध्ये जवळपास 13000 किलो पेक्षा जास्त एकल  प्लास्टिक महानगरपालिकेने जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे, जेणेकरून ते प्लास्टिक परत वापरात येऊ नये.
या कारवाईच्या धास्तीने शहरातील काही प्लास्टिक विक्रेत्यांनी स्वतःहून प्रतिबंधित प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे जमा केले आहे.

मोठ्या कारवायांचा धडाका कायम राहणार असून येत्या काही दिवसात शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांत अचानक छापेमारी करून हजारो किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात येणार आहे. या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नियमभंग करणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, मनपाने आपली भूमिका अधिकच आक्रमक केली आहे. मनपा प्रशासनाचा स्पष्ट इशारा दिला आहे की प्लास्टिक साठा, विक्री किंवा वापर याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमभंग आढळल्यास अचानक छापेमारी करून दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार साठा जप्ती, दंड आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

महानगरपालिका उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की यानंतर सुद्धा शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेते विरोधात नियमितपणे कारवाई करणे चालू राहणार तसेच नागरिकांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापरबंद करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे तसेच प्लास्टिक विक्रेत्या व्यावसायिकांना नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिका मदत करणार आहे तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.

शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे सर यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथकाचे देविदास सुसर, बालाजी साबळे, पोपट सिसोदे, जयेश मगरे हे कर्मचारी यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. यावेळी या पथकाच्या सोबतीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव तसेच स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.