छत्रपती संभाजीनगर(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इयत्ता चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा आज रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी मा.शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 85 शाळांमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रांवर संपन्न होणार असून सदर परीक्षेत इयत्ता चौथीचे 6378 विद्यार्थी तर इयत्ता सातवीचे 5378 विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत दोन पेपर असून परीक्षेची वेळ सकाळी साडेदहा ते बारा व दुपारी दीड ते तीन अशी राहणार आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे पुढील वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शासकीय विद्यानिकेतन येथे पुढील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्या जाते. अशी माहिती महानगरपालिका शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांनी दिली.तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर सोडणे व परत नेणे व उष्णतेची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

