छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
टप्पा क्रमांक ३ इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन आज सकाळी १० वाजता माननीय महापौर श्री. समीर राजूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माननीय स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये, सभागृह नेते श्री. गोविंद केंद्रे, महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील व सौ. कल्पिता पिंपळे, शहर अभियंता श्री. संजय कोम्बडे तसेच सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या लिफ्टमुळे टप्पा क्रमांक ३ इमारतीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांना याचा मोठा लाभ होणार आहे.
उद्घाटनानंतर महापौर, सभापती व आयुक्त यांनी दुसऱ्या मजल्यावरील श्रीमित्र कक्ष व कंट्रोल रूमला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महापौरांनी एका करदात्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून कर भरण्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले.*यावेळी श्री समीर राजूरकर यांनी कारण ना भरणारे एक लाख साठ हजार नागरिकांवर लक्ष देण्यासंबंधी सूचना केली ते म्हणाले की जशी वसुली मार्च महिन्यात करण्यात येते त्याच वेगाने आणि रोमाने उर्वरित मालमत्ता धारकाकडून देखील वसुली मोहीम सुरू ठेवावी.

