Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»आरोग्य»आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी चालू
आरोग्य

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी चालू

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर,दि,२३(जिमाका)- ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ येत्या २१ जून रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतिने १०० दिवसांचा विशेष ‘योग महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा आणि हॅबिल्ड हेल्थ टेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १४ दिवसांचे मोफत ऑनलाइन योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी व योगप्रेमींनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप व नोंदणी:

या मोहिमेअंतर्गत सर्व सामान्य नागरिक, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि आयुष संस्थांमधील योग प्रशिक्षकांना ऑनलाइन माध्यमातून योगाभ्यास शिकता येणार आहे. नोंदणीसाठी लिंक: https://moa.habit.yoga?ref=Maharashtra

टोल-फ्री क्रमांक: १८००३१५७००८ (नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधता येईल)

सूचना: नोंदणी केल्यानंतर व्हॉट्सॲपवर प्राप्त होणाऱ्या पुढील सूचनांचे पालन करावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, “योग हा निरोगी जीवनाचा आधार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत योग पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहावे.”

तसेच, जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील अहमद यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ‘निरोगी गाव, निरोगी देश’ हे स्वप्न साकारण्यासाठी योगाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.