छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
पैठण तालुक्यातील चितेगाव–बोकड जळगाव रोडवरील पांगरा शिवारात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. दोन तरुणांनी राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला पकडून त्याच्या डोक्यात काठी मारत निर्घृणपणे ठार केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हे दोन्ही तरुण मोराला मारत असताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी तात्काळ त्या तरुणांना पकडले आणि त्यांना चांगलाच चोप दिला. या दरम्यान एका तरुणाजवळ धारदार शस्त्र (चाकू) देखील आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, वन्यजीव प्रेमींनी कडक कारवाईची मागणी केली आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याचे संरक्षण Wildlife Protection Act, 1972 अंतर्गत करण्यात आले आहे. या कायद्यानुसार मोराला इजा करणे किंवा ठार मारणे हा गंभीर गुन्हा असून दोषींवर कठोर शिक्षा होऊ शकते.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांविरोधात तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
चितेगाव परिसरात संतापजनक घटना : मोराची निर्घृण हत्या, दोन तरुणांना नागरिकांकडून चोप
Related Posts
Add A Comment

