छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या प्रदेश प्रवक्ते पदी छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश पदी नियुक्ती करण्यात आली असून मंगळवारी (दि. २१) संघटनात्मक नियुक्ती भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने जाहीर करण्यात आली.
माजी उपमहापौर डॉ. प्रमोद राठोड यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेत उपमाहापौर, गटनेता, तसेच प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच आमदार संजय केणेकर यांच्या विचार आणि मार्गदर्शनात काम केले आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश “प्रवक्ते” पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल भारतीय जनता पार्टी, तसेच सर्व मित्र परिवार आणि समर्थकातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

