छत्रपती संभाजीनगर,(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)दि.22 एप्रिल:
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ऑनलाइन लॉटरी पद्धतीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना बँकांकडून गृहनिर्माण कर्ज मिळवून देण्यासाठी संबंधित विकासकांनी सक्रिय समन्वय ठेवावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी दिले.
ऑनलाइन लॉटरीत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम एकरकमी भरणे बंधनकारक असून, उर्वरित रकमेकरिता ते बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. लाभार्थ्यांची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी विकासकांनी बँक अधिकारी आणि लाभार्थी यांच्यात समन्वय साधून कर्ज मिळवून देण्यासाठी आवश्यक मदत करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
आयुक्तांच्या दालनात विकासकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी विकासकांनी कॉल सेंटरची स्थापना करावी. यामुळे प्रक्रियेचा पाठपुरावा करणे सुलभ होईल.
ऑनलाइन लॉटरीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेमार्फत संबंधित विकासकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सौ. कल्पिता पिंपळे, उप आयुक्त सौ. अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता श्री. विजय गोरे यांच्यासह औराथरोन जे.व्ही., लक्ष्मी जे.व्ही., सहकार जे.व्ही., युनिटी डेव्हलपर्स, सारा इन्फ्रास्ट्रक्चर आदी विकासकांचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी विकासकांनी समन्वय ठेवावा – आयुक्त अमोल येडगे
Related Posts
Add A Comment

