Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»फुलंब्रीतील महिलेची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली; महिलांना उद्योजकतेची प्रेरणा
छत्रपती संभाजीनगर

फुलंब्रीतील महिलेची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली; महिलांना उद्योजकतेची प्रेरणा

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर,दि,२१(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)- जिद्द, मेहनत आणि बचत गटाच्या माध्यमातून उभारलेला व्यवसाय यामुळे फुलंब्री तालुक्यातील सुनिता संतोष शिंदे या यशस्वी उद्योजिका म्हणून समोर आल्या आहेत. स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करत इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

सुनिता शिंदे या फुलंब्री येथील गृहिणी. २०१९ मध्ये त्यांनी स्वामी समर्थ महिला बचत गटात प्रवेश घेतला. बचतीबरोबरच व्यवसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आम्रपाली लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण व चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. यानंतर त्यांनी बँक कर्जाच्या सहाय्याने रेडीमेड कपड्यांचे दुकान सुरू केले.

दरम्यान, २०२० मध्ये नव्या संधींचा शोध घेत त्यांनी पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बचत गटातून ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन पाणीपुरी गाडी सुरू केली. सुरुवातीला रोज १,००० ते १,५०० रुपयांची उलाढाल होत होती. पुढे वैयक्तिक बँक कर्जाच्या माध्यमातून सुमारे २ लाख रुपयांचे भांडवल उभारून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि ज्यूस सेंटरही सुरू केले.

सध्या त्यांच्या पाणीपुरी व ज्यूस व्यवसायातून दररोज २,५०० ते ३,००० रुपयांची उलाढाल होत असून एकूण मासिक उलाढाल २ ते अडीच लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सर्व खर्च वजा जाता सुमारे १ लाख रुपयांपर्यंत निव्वळ बचत होत आहे. त्यांच्या या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असून मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी भक्कम आधार निर्माण केला आहे.

खुलताबाद रोड, फुलंब्री येथे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत त्यांचा पाणीपुरी व ज्यूस सेंटर व्यवसाय सुरू असतो. विशेष म्हणजे, त्यांनी बचत गटातील दोन महिलांना रोजंदारीवर रोजगार उपलब्ध करून दिला असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीतही त्यांनी हातभार लावला आहे.

“प्रत्येक महिलांनी जिद्द ठेवून व्यवसाय सुरू करावा. बचत गट हा महिलांसाठी मोठा आधार ठरू शकतो,” असा संदेश सुनिता शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या यशोगाथेमुळे फुलंब्री तालुक्यातील अनेक महिलांना उद्योजकतेची प्रेरणा मिळत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.