छत्रपती संभाजीनगर: ( महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आपल्या प्रशासकीय उत्कृष्टतेचे दर्शन घडवत दोन मानाचे पुरस्कार स्वीकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या ‘आम्हाला खेळू द्या’ आणि ‘व्हॉट्सअॅप चॅटबॉट’ या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘शासकीय अधिकारी’ श्रेणीत तत्कालीन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आम्हाला खेळू द्या’ या प्रकल्पाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहरातील मुलांचे आरोग्य आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह महानगरपालिकेचे मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील आणि उपायुक्त विकास नवाळे यांनी हा बहुमान स्वीकारला. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दुसरीकडे, स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका स्तरावरील थेट प्रस्तावांच्या श्रेणीत ‘व्हॉट्सअॅप चॅटबॉट’ या डिजिटल सुविधेला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरी सेवा सुलभ केल्याबद्दल मिळालेला हा ६ लाख रुपयांचा पुरस्कार विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड आणि प्रोजेक्ट मॅनेजर आयटी फैज अली यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते स्वीकारला. या दुहेरी यशामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीवर राज्यस्तरावरून मोहोर उमटवण्यात आली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा मुंबईत डंका; दोन स्वतंत्र सोहळ्यांत राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Related Posts
Add A Comment

