. http://maharashtranewstimes.in/wp-admin/
छत्रपती संभाजीनगर,(महाराष्ट्र न्यूज टाइम्स)दि. 20 एप्रिल:
शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कांचनवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाईपलाईन टाकण्याच्या कामास गती देण्याचे निर्देश मा सभापती स्थायी समिती श्री अनिल मकरिये यांनी आज एका बैठकीत दिले.
बैठकीदरम्यान मा. सभापती यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना माहिती घेतली की जायकवाडीतून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी एकूण 19 मीटर ची पाईपलाईन टाकण्याचे कामातून सध्या स्थितीत सुमारे 600 मिटर पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी आहे सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या जुन्या व मुख्य पाणीपुरवठा लाईनची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.
यावर मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांनी सांगितले की, संबंधित कामे प्राधान्याने हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.
याशिवाय उर्वरित पाईपलाईनचे काम 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले. पुढील कामांसाठी आवश्यक अंदाज तयार करून संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले.
सदरील बैठकीत स. नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री सुरेंद्र कुलकर्णी, श्री राज वानखेडे, कार्यकारी अभियंता वसंत भोय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

