छत्रपती संभाजीनगर,(
महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)दि.18 एप्रिल:
आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महापौर श्री.समीर राजूरकर यांच्या मार्गदर्शनात व श्री अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून मालमत्ता कर वसुलीत वाढ करण्यासाठी “ *माझा कर – माझी जबाबदारी”* ही विशेष कर आकारणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या अभिलेखानुसार सुमारे 3.20 लाख मालमत्तांची नोंद असली तरी अद्याप अनेक मालमत्तांवर कर आकारणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्तांना कराच्या कक्षेत आणून महसूल वाढविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
ही मोहीम दि. 20 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, सर्व झोन कार्यालये व मुख्यालयात विशेष हेल्पडेस्क स्थापन करण्यात येणार आहेत. नागरिकांना कर आकारणीसाठी अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे तसेच करासंदर्भात मार्गदर्शन या माध्यमातून मिळणार आहे.
प्राप्त अर्जांवर 7 ते 15 दिवसांच्या आत कार्यवाही करून कर आकारणी पूर्ण करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार तत्काळ कर निर्धारणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच GIS सर्वेक्षणात आणि गुंठेवारी मोहिमेत आढळलेल्या कर न आकारलेल्या मालमत्तांचा समावेश करून कर जाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येणार आहे.
मोहीमेदरम्यान प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, एकूण सुमारे 45,615 नवीन मालमत्तांवर कर आकारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय, 2025-26 मध्ये कर न भरलेल्या मालमत्तांवर विशेष लक्ष केंद्रित करून वसुलीचे उद्दिष्टही निर्धारित करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक झोन कार्यालयात “ *कर समाधान डेस्क”* उभारण्यात येणार असून, करासंबंधित सर्व समस्या, आक्षेप निवारण व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मोहीमेचा आढावा दर सोमवारी मा.आयुक्त स्तरावर घेण्यात येणार असून, चुकीची कर आकारणी अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.तसेच दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता मा.आयुक्त कर समाधान शिबिर आयोजित करण्यात येईल व यावेळी कर संदर्भात असलेल्या समस्यांचा तत्काळ निराकरण केले जाईल.
यावेळी मा. महापौर यांनी नागरिकांना आवाहन केले की, या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व नियमित कर भरून शहराच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा.
मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी सांगितले की, नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत मालमत्ता कर आकारणी करून घ्यावी. तसेच सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आयुक्त दर आठवड्याला कर समाधान शिबिरात प्रत्यक्ष उपस्थित राहून आक्षेपांचे निवारण करणार आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मालमत्ता कर वसुलीत वाढीसाठी मनपाचे पाऊल “माझा कर – माझी जबाबदारी” ह्या मोहिमेद्वारे वसुली चालू
Related Posts
Add A Comment

