छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महावीर इंटरनॅशनल या संस्थेची, छत्रपती संभाजीनगर (मुख्य शाखा) तर्फे “वसीयत लेखन व इस्टेट प्लॅनिंग
“(मृत्युपत्र लेखन आणि मालमत्ता नियोजन) या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता महावीर भवन, कुंभारवाडा, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे हा परिसंवाद होणार आहे.
मृत्युपत्र तयार करण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, हा या परिसंवादाचा उद्देश आहे. व्यवस्थितपणे तयार केलेले मृत्युपत्र कौटुंबिक वाद, गैरसमज आणि तणाव टाळण्यास मदत करते, तसेच मालमत्तेचे योग्य वाटप सुनिश्चित करून कुटुंबात सलोखा टिकवून ठेवते.
या कार्यक्रमात, अॅड. रामेश्वरजी तोतला, ॲड. अमोलजी काकडे आणि सीए एम आर हुंडीवालाजी मार्गदर्शन करतील आणि ते कायदेशीर बाबी, कागदपत्रे आणि कराच्या परिणामांबद्दल सविस्तर माहिती देतील.
यासोबतच, महावीर इंटरनॅशनल एपेक्सच्या “सुकुन की छाँव” या उपक्रमांतर्गत, गरजू पथविक्रेत्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी छत्री वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
आयोजकांनी सर्व नागरिकांना या मोफत सेमिनारचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
संपर्क : कैलास बाफना – 9372666999
संपर्क : सागर मुगडीया – 9423782760
संपर्क : नंदलालजी बोथरा – 9422204967
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महावीर इंटरनॅशनल तर्फे वसीयत लेखन व इस्टेट प्लॅनिंग समजून घेण्यासाठी मोफत सेमिनार
Related Posts
Add A Comment

