छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स – प्रतिनिधी)
लासुरस्टेशन येथे संतप्त शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद
लासुरस्टेशन दि. १६ – गेल्या आठ दिवसांपासून लासुरस्टेशन येथील कांदा बाजारात कांद्याला अत्यंत कमी, मातीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद पाडला. यामुळे बाजार समितीतील व्यवहार पूर्णतः ठप्प झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र, व्यापाऱ्यांकडून १०० रुपये ते ७०० रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. याउलट, २८ एप्रिल रोजी येवला बाजार समितीत कांद्याला १३०० ते १४०० रुपये प्रति क्विंटल असा समाधानकारक दर मिळाला होता.
दरातील या मोठ्या तफावतीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत लिलाव प्रक्रिया थांबवली. परिणामी, सुमारे ५०० ते ७०० वाहने कांदा लिलावासाठी आले परंतु तीन तास लिलाव शेतकऱ्यांनी बंद ठेवला बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव , उपसभापती अनिल चव्हाण , संचालक संतोष जाधव, सुरेश जाधव, सबोध मुथा हे त्वरित कांदा मार्केट मध्ये दाखल होऊन. शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये समेट घडून आनुन. स्व ताहा उभे राहून लिलाव प्रक्रिया सुरू केली घटनेमुळे लासुरस्टेशन बाजार समितीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कांद्याला योग्य आणि हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शेतकऱ्यांनी कांदा लिलाव प्रक्रिया थांबवली. प्रत्येक शेतकऱ्याने जागृत होणे फार गरजेचं
Related Posts
Add A Comment

