छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
खुलताबाद तालुक्यात सराई येथील गायरान जमिनीतून शेकडो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून तो खुलताबाद पंचायत समितीच्या रस्ता कामासाठी वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे, कोणतीही रॉयल्टी न भरता ही ‘लूट’ राजरोसपणे सुरू असताना प्रशासन सुस्त असल्याचे चित्र आहे.सध्या महसूल प्रशासनाचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रात्रीचा खेळ, ‘विना नंबर’चा मेळ !
खुलताबाद तालुक्यातील सराई शिवारातील गायरान जमिनीवर रात्रीच्या वेळी पोकलेनच्या साहाय्याने जमिनीची विल्हेवाट लावली जात आहे. या ठिकाणाहून चोरलेला मुरूम वाहून नेण्यासाठी चक्क नंबर
नसलेल्या ‘हायवा’ गाड्यांचा वापर केला जात आहे.रात्रीच्या अंधारात रस्ते कामाचे ‘साईड पट्टे’भरण्यासाठी हा अवैध मुरूम वापरला जात असून, संबंधित कंत्राटदाराने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची चर्चा आहे. तहसीलदारांच्या निवासस्थानासमोरूनच वाहतूक?
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ज्या मार्गावरून ही अवैध मुरुमाची वाहतूक होत आहे,तो मार्ग खुद्द तहसीलदार महोदयांच्या निवासस्थानासमोरून जातो. आपल्या दारासमोरून विना नंबरच्या गाड्या अवैध साठा घेऊन जात असताना,महसूल विभागाला याचा सुगावा कसा लागला नाही? की याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे
कंत्राटदारावर कारवाई होणार का? शासकीय कामासाठीच जर अवैध उत्खननाचा मुरूम वापरला जात असेल, तर नियमांची अंमलबजावणी कोणी करायची? असा प्रश्न उभा ठाकला आहे. महसूल विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मुजोर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि शासनाचा बुडलेला महसूल वसूल करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सराई गायरानातून शेकडो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन; तहसीलदारांच्या ‘नाकाखाली’ सरकारी मुरूम व मातीचे लूट! विना क्रमांकाच्या हायवांची रात्रभर धुमाकूळ
Related Posts
Add A Comment

