छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी):
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहातून उभारलेल्या “ऋणानुबंध” या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “उत्सव उत्कृष्टतेचा, सन्मान वारशाचा…” या भावनेतून होणाऱ्या या कार्यक्रमात संस्थेच्या मान्यवर माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच ऋणानुबंधचे माजी अध्यक्ष श्री राम भोगले यांना राजस्थान येथील पंडित दीनदयाल उपाध्याय शेखावाटी विद्यापीठ, सीकर यांच्यातर्फे प्रदान करण्यात आलेल्या “डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मानद उपाधी)” या उल्लेखनीय सन्मानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. शिक्षण, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे.
तसेच ऋणानुबंधचे माजी अध्यक्ष श्री उमेश दाशरथी यांना जपान इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट मॅनेजमेंटतर्फे प्रदान करण्यात आलेल्या जेआयपीएम टीपीएम एक्सलन्स अवॉर्ड (JIPM TPM Excellence Award) या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रम तपशील :
दिनांक : १८ एप्रिल २०२६
वेळ : सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ : गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृह, छत्रपती संभाजीनगर
याप्रसंगी संस्थेच्या पुढील वाटचाली विषयी चर्चा करण्यात येणार असून,
या सत्कार समारंभास सर्व माजी विद्यार्थी, मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रसाद कोकिळ, प्रशांत देशपांडे, अजय कुलकर्णी, सुहास वैद्य तसेच ऋणानुबंध टीम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

