छत्रपती संभाजीनगर (
महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
दि.१५ एप्रिल स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने हॉटेल रामा येथे झालेल्या विभागीय परिषदेत एसबीआय कडून सीएसआर अंतर्गत १ कोटी 20 लाखाचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे स्टेट बँक ऑफ इंडिया चे चेअरमन Challa Sreenivasulu Setty चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांनी सांगितले.
यामध्ये महानगरपालिकेच्या दहा शाळांमध्ये रूफ टॉप सोलर लावून देण्यात येणार असून यामुळे सर्व दहा शाळांमध्ये इलेक्ट्रिक बिल शून्य होणार आहे. यासाठी एसबीआय ने जवळपास 48 लाख रुपये निधी राखीव ठेवला आहे. व लवकरच काम सुरू होणार आहे. तसेच मनपाच्या वैद्यकीय विभागास थेलेसेमीया व सिकल सेल ॲनिमिया तपासणीसाठी चार मशीन व आठ हजार तपासणीचे किट. आणि एक सोनोग्राफी मशीन यासाठी एकूण 70 लाख देण्याचे जाहीर केले आहे.
याप्रसंगी महानगरपालिका शिक्षण विभाग उपायुक्त श्री अंकुश पांढरे व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधीचे वितरण करण्यात आले.
मागच्या वर्षी एसबीआय ने सी एस सर निधी मधून महापालिकेच्या पाच शाळा सोलार रूफ टॉप करून देण्यात आल्या होत्या. या शाळांचे मागील एक वर्षापासून शून्य रुपये वीजबिल येत आहे. असे उपायुक्त अंकुश पांढरे यांनी सांगितले.
याप्रसंगी एसबीआय चे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर व
त्रिभुवन व शहरातील व जिल्ह्यातील सर्व एसबीआय मॅनेजर उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
SBI कडून मनपाच्या शाळा व वैद्यकीय विभागात CSR अंतर्गत एक करोड 20 लाख रुपयांचा निधी; रूफ टफ सोलर मुळे येणार वीजबिल शून्यावर
Related Posts
Add A Comment

