Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»36 मीटर मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर मशीनचे लोकार्पण; शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर

36 मीटर मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर मशीनचे लोकार्पण; शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री संजय शिरसाट

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)

छत्रपती संभाजीनगर,
शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत, शहराचे नाव उंचावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री संजय शिरसाट यांनी केले.
जिल्हा नियोजन समिती (DPDC) मार्फत प्राप्त निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट मशीनचे लोकार्पण आज सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालय येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री श्री शिरसाट पुढे म्हणाले की, नवीन डीपीडीसीआर कायद्यांतर्गत उंच इमारतींना परवानगी दिली जात असल्याने, अशा इमारतींमध्ये आग लागल्यास नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आवश्यक आहे. याच विचारातून सदर मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला.
तसेच, विकसित होत असलेल्या झूलॉजिकल पार्कसाठी अतिरिक्त 17 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, महानगरपालिकेला गावठाण जमीन मिळावी यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर, त्याच महापालिकेच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मा .महापौर श्री समीर राजूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना, सदर यंत्रसामग्रीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. नवीन डीपीडीसीआर कायद्यामुळे उंच इमारती वाढणार असून, अशा वेळी ही यंत्रणा अग्निशमन दलासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. तसेच गुंठेवारी भागातील अरुंद रस्त्यांवर पोहोचू शकतील अशी लहान अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
उपमहापौर मा. श्री राजेंद्र जंजाळ यांनी अग्निशमन वाहन पुरवठादार संस्थांना सूचना देताना, वाहनांची गती मर्यादा (स्पीड लॉक) ठेवू नये, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी तत्काळ पोहोचणे शक्य होईल, असे सांगितले.
महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे यांनी सांगितले की, भविष्यात शहरात उंच इमारतींची संख्या वाढणार असून, या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आग नियंत्रणास मदत होईल तसेच अग्निशामकांच्या जीविताचा धोका कमी होईल.
या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते श्री अब्दुल समीर साजिद, गटनेते श्री किशोर नागरे (शिंदे सेना), श्री हाजी शेरखान (AIMIM), नगरसेविका श्रीमती कीर्ती शिंदे, कुमारी हर्षदा शिरसाट, श्रीमती अनिता मानकापे, तसेच सदस्य श्री रशीद खान, श्री सचिन खैरे, श्री अब्दुल मतीन खान आदींसह महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रणजीत पाटील, श्रीमती कल्पिता पिंपळे, मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री संतोष वाहुळे, शहर अभियंता श्री संजय कोंबडे, उपआयुक्त श्री अंकुश पांढरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) श्री अमोल कुलकर्णी, श्री वसंत भोय, श्री संजय गोरे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे बहुमजली इमारतींना अग्निसुरक्षा पुरविण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे मा. पालकमंत्री श्री संजय शिरसाट साहेबांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीद्वारे महानगरपालिकेला रु. 15,78,78,000/- कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महानगरपालिकेने 36 मीटर उंचीचे मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट खरेदी केला आहे. या मशिनरीच्या सेट मध्ये 36 मीटर उंचीचे 01 वॉटर टॉवर, 14000 लिटर क्षमतेचे 01 वॉटर बाउझर व 01 रोबोट ही अत्याधुनिक यंत्रणा आहे. सदरील आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर हे जर्मन टेक्नॉलॉजीचे असून, “स्विंग” या जर्मन कंपनीचे भारतातील व्यावसायिक भागीदार मे. निधी एंटरप्रायझेस, मुंबई यांनी मशिनरीचा पुरवठा केला आहे.
या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर द्वारे 10 ते 12 मजली इमारतींना अग्निसुरक्षा पुरविणे शक्य होणार आहे. वॉटर टॉवरच्या बुमला थर्मल मॉनिटरिंग कॅमेरा व फायर फायटिंग मॉनिटर असून, कॅमेराद्वारे बहुमजली इमारतीवर लागलेली आग वाहनाच्या स्क्रीनवर दिसते. मशिनरीचा ऑपरेटर वाहनाच्या कंट्रोल पॅनलद्वारे थर्मल कॅमेराच्या मदतीने तळमजल्यावरून आगीवर नियंत्रण मिळवू शकतो, त्यासाठी फायरमनला प्रत्यक्ष आगीच्या जवळ जाण्याची आवश्यकता पडत नाही. वॉटर टॉवर यंत्रणेला वॉटर बाउझर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट मधील रोबोटद्वारे फायरमनला आगीच्या जवळ न जाता तळमजल्यावरील आग विझविणे शक्य होणार आहे. उत्पादक कंपनीकडून सदरील यंत्रणा नुकतीच महानगरपालिकेला प्राप्त झाली असून, लोकार्पण व उचित प्रशिक्षणानंतर या मशिनरीचा प्रत्यक्ष वापर सुरु करण्यात येणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.