छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीतील धुळे-सोलापूर महामार्गावर आयोजित सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
दिनांक १५/०४/२०२६ ते १८/०४/२०२६ या कालावधीत दररोज पहाटे ०५:०० ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत झाल्टा फाटा ते SRPF कॅम्प (१० कि.मी.) या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून ती खालीलप्रमाणे वळवण्यात आली आहे:
वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग:
• बंद मार्ग: झाल्टा फाटा ते SRPF कॅम्प (दोन्ही बाजूंची वाहतूक).
• पर्यायी मार्ग: बीडकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे धुळ्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक हॉटेल पालखी जवळून धुळे-सोलापूर महामार्गावरील पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
सदर सायकलिंग स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होणार आहेत. महामार्गावर खेळाडूंची सुरक्षा राखण्यासाठी आणि कोणताही अपघात टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
सकाळी १०:०० वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणे पूर्ववत केली जाईल. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नागरिकांनी पोलीस दलास सहकार्य करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

