छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
वेरूळ लेणीसमोरील मुख्य रस्त्यावर अनधिकृत दुकानांचे वाढते अतिक्रमण पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. विशेष म्हणजे ही बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. रत्नपुर-खुलताबाद पोलीस स्टेशनकडून होत असलेल्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

