छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महानगरपालिका , इंटॅक व मिलिंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित मिलिंद कॉलेज येथे हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले होते.
मा. पालक मंत्री श्री.संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली या हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा.महापौर समीर राजुरकर,स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, स.नगरसेवक रशीद खान मामू,उप आयुक्त पर्यटन विभाग अंकुश पांढरे,डॉ.वैशाली प्रधान प्राचार्य मिलिंद कॉलेज ,मुख्याध्यापक संजीव सोनार,इंटॅक चे स्वप्नील जोशी ,संकेत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती .
प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कॉलेज परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर प्राचार्य वैशाली प्रधान यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले .व मिलिंद महाविद्यालय इमारत व स्थापनेची माहिती दिली.इंटॅक चे संकेत कुलकर्णी यांनी मान्यवरांना डॉ.बाबासाहेबांचं शहरातील वास्तव्य व आठवणी या बाबत माहिती दिली.ते केव्हा आले त्यांचे सोबत कोण कोण सहकारी होते या सर्वांच्या आठवणीना उजाळा देत महाविद्यालय परिसर या ठिकाणी असलेले दुर्मिळ फोटो,तसेच महाविद्यालय यांनी स्थापन केलेल्या संग्रहालयात बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू,त्यांचे फोटो या बाबतची संपूर्ण माहिती दिली.
यावेळी महाविद्यालय यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना बुद्ध व त्याचा धम्म हे पुस्तक भेट देण्यात आले.
मनपा प्रियदर्शनी शाळेच्या सिंफनी बँड पथकाने भीम गीते सादर करून बाबासाहेबांना अभिवादन केले.त्यांना यावेळी मिलिंद महाविद्यालय बँड पथकाची सुद्धा साथ लाभली.त्यांनी ही सुरेख भीम गीते सादर करून बाबासाहेबांना संगीतमय अभिवादन केले.
अन्नामृत फाउंडेशन यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित हेरिटेज वॉक ने स्मृतींना उजाळा व मनपा प्रियदर्शनी शाळेच्या सिंफनी बँड द्वारे संगीतमय अभिवादन
Related Posts
Add A Comment

