छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती व क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची 199 वी यांचा संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम अविष्कार कॉलनी येथील विश्वस्त महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार एन -6 सिडको येथे मोठ्या उत्सहात पार पडला. यावेळी सकाळी मुख्य कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला व अभिवादन करण्यात आले. तसेच विविध सामाजिक संस्थाच्या वतीने भीमजन्मोत्सव मिरवणूक कॉलनीत काढण्यात आली. या मिरवणुकीत ‘जयभीम ‘ च्या घोषनांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अॅड. माधुरी अडवंत देशमुख, नगरसेवक मयूर भैया वंजारी, शिवकुमार देशमुख, प्रमुख वक्ते अरुण नवले पाटील व अॅड. दयानंद भांगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तविक प्रा. उज्वला.एम. खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिया रगडे यांनी मानले. यावेळी समिती अध्यक्ष अॅड. शंकरराव नारनवरे,कोषाध्यक्ष -गायकवाड साहेब, सचिव – विठ्ठलराव पवार, सहसचिव -बबन जमधाडे, स्वागतअध्यक्ष -एम. जी. गाढे, भानुदास बागुल,जी. डी. पवार, अतुल अंभोरे,देविदास मगरे, भुईंगड सर,राहुल सोनपसारे,कुशल अवचरमल,भुजंग साहेब विरभद्र गादगे, सखाहरी घुले, देसाई काका, कपूर बारवाल, बन्सीलाल वंजारी, झुंजारकर काका, आसवार काका, राजू भाऊ पडुळ, तसेच महिला मंडळ भुईंगड ताई,नंदा ताई वंजारी,द्रौपदाताई नारनवरे, दीपिका देशमुख,आशा अंभोरे, सुमनताई गाढे,रत्नप्रभा बागुल,सुशीला पवार,सुमन पठारे, वंदना बनसोड,सोनपसारे ताई, गायकवाड ताई,जोगदंड ताई, धनेधर ताई,प्रमिलाताई पतंगे,कमलाताई पठारे,प्रभाताई नन्नवरे,त्रिभुवन ताई,शर्मिला ताई गाढे, मगरे ताई, लतिका खोब्रागडे यांची उपस्तिथी होती.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. प्रमुख वक्ते म्हणून श्री अरुण नवले पाटील व ॲड दयानंद भांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन
Related Posts
Add A Comment

