Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर प्राप्त; अग्निशमन सेवेत मोठी झेप.
छत्रपती संभाजीनगर

36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर प्राप्त; अग्निशमन सेवेत मोठी झेप.

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 14, 2026Updated:April 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर,(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
शहरातील वाढत्या बहुमजली इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम व आधुनिक करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त निधीतून 36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट मशीनरीची खरेदी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडे यापूर्वी बहुमजली इमारतींमध्ये आग लागल्यास प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रणा उपलब्ध नव्हती. ही गरज ओळखून मा. पालकमंत्री श्री संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे रु. 15.78 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट खरेदी करण्यात आला आहे.
या संचामध्ये 36 मीटर उंचीचा वॉटर टॉवर, 14,000 लिटर क्षमतेचा वॉटर बाउजर आणि अग्निशमनासाठी उपयोगी रोबोटचा समावेश आहे. ही यंत्रणा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून “स्विंग” या नामांकित जर्मन कंपनीची आहे. भारतातील अधिकृत प्रतिनिधी मे. निधी एंटरप्रायझेस, मुंबई यांच्या मार्फत या मशीनरीचा पुरवठा करण्यात आला आहे.
ही अत्याधुनिक यंत्रणा 10 ते 12 मजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास सक्षम ठरणार आहे. वॉटर टॉवरच्या बूमवर बसविण्यात आलेल्या मॉनिटरिंग कॅमेरा व फायबर ऑप्टिक प्रणालीद्वारे आगीचे अचूक निरीक्षण करता येते. तसेच थर्मल कॅमेऱ्याच्या सहाय्याने वाहनाच्या कंट्रोल पॅनेलमधून ऑपरेटरला तळमजल्यापासूनच आगीवर नियंत्रण मिळविता येणार असून, यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आगीजवळ जाण्याचा धोका टाळता येणार आहे.
यंत्रणेमध्ये असलेल्या रोबोटच्या साहाय्याने आग विझविण्याचे काम अधिक सुरक्षित आणि जलदगतीने पार पाडता येणार आहे. बाउजरद्वारे सतत पाणीपुरवठा सुनिश्चित केला जात असल्याने आग विझविण्याची कार्यक्षमता अधिक वाढणार आहे.
सदरची यंत्रणा नुकतीच महानगरपालिकेला प्राप्त झाली असून, लोकार्पणानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिल्यानंतर या मशीनरीचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेच्या समावेशामुळे शहरातील अग्निशमन सेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि परिणामकारक होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.