छत्रपती संभाजीनगर,(महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
मिटमिटा येथे उभारण्यात येत असलेल्या झूलॉजिकल पार्कचे सर्व कामे येत्या मान्सूनपूर्वी पूर्ण करावीत, तसेच पार्क परिसरात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी दिले.
आज (दि. १० एप्रिल) आयुक्तांनी मिटमिटा येथील झूलॉजिकल पार्कच्या कामाची पाहणी करून विविध बाबींवर सविस्तर सूचना केल्या. पार्कमध्ये प्राण्यांच्या जाती व वंशानुसार पायवाटांवर कलर कोडिंग करण्याचे निर्देश देताना, सिंह व वाघांसारख्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांसमोर कॅट फॅमिलीचे ठराविक रंगसंगतीत पेंटिंग करावे, असे त्यांनी सांगितले.
पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हिरवाई वाढविणे, तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी बस सेवा व ई-कार्ट प्रणाली विकसित करण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय विमानतळ, रेल्वे स्टेशन व बसस्थानक येथून झूलॉजिकल पार्कपर्यंत दिशा दर्शक फलक उभारणे आणि स्मार्ट सिटी बससेवेचे मार्ग निश्चित करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
पार्कमधील पायवाटांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करून परिसर अधिक आकर्षक करावा, तसेच ऊर्जा गरजा भागविण्यासाठी पवनचक्की प्रकल्प राबविण्याचे नियोजन करावे, असेही आयुक्तांनी सांगितले.
मान्सून पर्यंत बांधकाम संपूर्ण केल्यावर तद्नंतर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी आणि पुढच्या वर्षी वृक्ष वाढल्यावर प्राण्यांना आणण्याचा विचार करू, असे ते म्हणाले.
जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या पाहणीवेळी मुख्य उद्यान अधिकारी श्री. विजय पाटील, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र जोगदंड, प्रकल्प अधिकारी श्री. इमरान खान, सौ. स्नेहा नायर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मिटमिटा झूलॉजिकल पार्कचे बांधकाम मान्सूनपूर्वी पूर्ण करा; प्लास्टिकला बंदी – आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश
Related Posts
Add A Comment

