Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»आंबेडकर जयंती मिरवणूक सुरळीत व्हावी ,भाविकांना त्रास होऊ नये – महापौरांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर

आंबेडकर जयंती मिरवणूक सुरळीत व्हावी ,भाविकांना त्रास होऊ नये – महापौरांचे निर्देश

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)दि. 10 एप्रिल:
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर श्री. समीर राजूरकर यांनी दिले.
आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरीये, आयुक्त श्री. अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील, सौ. कल्पिता पिंपळे, शहर अभियंता श्री. संजय कोंबडे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) श्री. अमोल कुलकर्णी, सौ. मोहिनी गायकवाड, श्री. विजय गोरे तसेच सर्व सहाय्यक आयुक्त व वॉर्ड अभियंते उपस्थित होते.
महापौरांनी निर्देश देताना सांगितले की, मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तसेच उघडे ढापे बंद करून पथदिवे सुरळीत सुरू राहतील आणि मिरवणूक मार्गावरील स्वच्छता राहतील याची खात्री करावी.
सदर मिरवणूक क्रांती चौक – पैठण गेट – सिटी चौक – पोस्ट ऑफिस मार्गे भडकल गेटपर्यंत काढण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गाची महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्त पाहणी करून जयंतीच्या एक दिवस आधी सर्व अडथळे दूर करावेत, असेही त्यांनी सांगितले.
मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
याशिवाय, दरवर्षी प्रमाणे भडकल गेट येथे स्टेज आणि पुतळ्याची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागानी करावी आणि विद्युत रोषणाई, म्युझिक सिस्टम आणि सुशोभीकरण महानगरपालिकेने करावा, ते म्हणाले.
उपमहापौरांनी निर्देश दिले की, मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या स्टेज दिलेल्या परवानगीनुसारच बांधलेले आहे का, याची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी. नियोजित जागेपेक्षा अधिक जागा व्यापल्यास मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्थायी समिती सभापती यांनी मिरवणूक मार्गावर तसेच भडकल गेट येथे ॲम्बुलन्स व डॉक्टरांची व्यवस्था ठेवण्याची सूचना केली.
आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी मुख्य कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्टेजची क्षमता आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.