छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
देशात सुमारे १६ वर्षांनंतर होत असलेल्या जनगणनेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शहराची जनगणना यशस्वी करावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी केले.
जनगणना निमित्त प्रशिक्षण सत्र सुरू असून आज स्मार्ट सिटी येथे फील्ड ट्रेनर्ससाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
आयुक्त म्हणाले की, भारतात प्रथमच डिजिटल स्वरूपात जनगणना होत असून या प्रक्रियेचा भाग होण्याचा अभिमान सर्वांनी बाळगावा. फील्ड ट्रेनर्सनी प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन प्रभावीपणे पुढे द्यावे, असेही त्यांनी सांगितले. जनगणनेच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिकेतील एकूण ५९ शिक्षकांची फील्ड ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मास्टर ट्रेनर श्री. रुपेश शिंगारे (उपजिल्हाधिकारी) व श्री. शिवानंद नळगिरे (नगररचनाकार, नगररचना विभाग) यांनी प्रशिक्षण दिले.
हे ५९ फील्ड ट्रेनर्स दिनांक २७ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत सुमारे २५०० ते ३००० पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षित पर्यवेक्षक व प्रगणक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन घरगणना करतील. त्यानंतर फेब्रुवारी २०२७ मध्ये मुख्य जनगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आता डिजिटल जनगणना सुरू होणार.
Related Posts
Add A Comment

