छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) दि.10 एप्रिल:
शहरातील झाडांवर जाहिरात किंवा माहिती फलक लावणाऱ्या नागरिक व संस्थांविरुद्ध शहर विद्रूपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी दिले.
महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही झाडांवर खिळे ठोकणे, जाहिरात अथवा माहिती फलक लावणे किंवा झाडांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचविणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिक आणि संस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, शहरातील झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सहकार्य करावे. झाडांवर कोणत्याही प्रकारचे फलक न लावता पर्यावरणाचे जतन करण्यास पुढाकार घ्यावा.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
झाडांवर जाहिरात फलक लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, आयुक्त अमोल येडगे
Related Posts
Add A Comment

