छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम,प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी श्री.शिरसाठ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक बाबुराव कदम समितीचे अध्यक्ष नवीन सिंग ओबेराय पृथ्वीराज पवार ख्वाजा शरफोद्दीन किशोर थोरात बाळकृष्ण इंगळे दादाराव राऊत अरविंद अवचरमल नगरसेवक रशीद मामू कॉ.सुभाष लोमटे दिलीप पाडमुख कयूम भाई मंजुषा पवार विकास जैन सुमित खांबेकर अजमत भाई यांची उपस्थिती होती आपल्या भाषणात पुढे बोलताना श्री.शिरसाठ म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपती संभाजी नगरला मोठ्या प्रमाणावर आंबेडकर जयंती साजरी होते छत्रपती संभाजीनगर हे चळवळीचे केंद्र आहे या चळवळीतून अनेक पुढारी तयार झाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संभाजीनगरला कर्मभूमी मानले नागसेन वनात शैक्षणिक संस्था उभारून मराठवाड्यातील गोरगरीब दिन दलित दुबळ्या विद्यार्थ्यां साठी शिक्षणाची सोय करून दिली मिलिंद महाविद्यालयातून शिकलेली विद्यार्थी मंत्रालयात मोठ्या पदावर अधिकारी झाल्या चे मी पाहतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपले जीवनमान सुधारले आहे त्यामुळे त्यांची जयंती दणक्यात झालीच पाहिजे जयंती साजरी करताना कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी डीजे वाजवण्याची काही अडचण नाही परंतु आवाजाला काही मर्यादा असायला हवी ती पाळणे गरजेचे आहे शहरांमध्ये ड्रग्सचा व्यापार वाढत चालला आहे ड्रग्सचा व्यापार करणाऱ्या लोकांना समोर आणा त्यांच्यापासून लांब रहा असा सल्लाही श्री शिरसाठ यांनी दिला यावेळी बोलताना जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक बाबुराव कदम म्हणाले शहरामध्ये 1975 पासून आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली जयंतीच्या निमित्ताने झोपडपट्ट्यात व इतर वसाहतीमध्ये जाऊन प्रबोधन केले पॅंथरची चळवळ शहरात वाढत गेली त्यानंतर आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचा पायंडा पडला बाबासाहेब हे कोण्या एका जातीचे नसून सर्व जातीचे आहे म्हणून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती स्थापन केली दिवंगत माजी महापौर मनमोहन सिंग ओबेराय यांनी स्वखर्चाने जवळपास 35 वर्ष आंबेडकर जयंती साजरी केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवीन सिंग ओबेराय हे सर्वांना सोबत घेऊन आंबेडकर जयंती साजरी करीत आहे डीजे मुळात त्रास होतो हे सत्य असले तरी डीजे वाजलाच पाहिजे कमी आवाजात डीजे वाजवण्यासाठी पोलिसांनी परवानगी द्यावी त्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवीनसिंग ओबेराय यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभी समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आमदार प्रदीप जैस्वाल यांनी उत्सव समितीच्या कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी शिवाजीराव कवडे लक्ष्मण हिवराळे इब्राहिम पठाण विश्वनाथ दांडगे विजय कांबळे डॉ.पी वाय कुलकर्णी अशोक बनस्वाल रवी जावळे नितीन सूर्यवंशी विश्वजीत काळे सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन
Related Posts
Add A Comment

