छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)दि. 09 एप्रिल:
शहरात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी व निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवर उपाय म्हणून हायड्रोलिक पार्किंग ही आधुनिक संकल्पना राबविण्याची सूचना मा. स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरिये यांनी आज केली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे यांच्या दालनात आयोजित बैठकीत हायड्रोलिक पार्किंग संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील उपलब्ध जागांचा अभ्यास करून हायड्रोलिक पार्किंगसाठी योग्य ठिकाणे निश्चित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
तसेच, या प्रकल्पासाठी तज्ञ कंपन्यांना आमंत्रित करून स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे कमी दरात आणि दर्जेदार काम करणाऱ्या कंपनीकडून काम करून घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
याच बैठकीत शहरातील प्रमुख बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी ई-टॉयलेट उभारण्याचा मुद्दा देखील मा. सभापती यांनी उपस्थित केला. वसंत भवन, औरंगपुरा भाजी मंडई तसेच शहरातील इतर मुख्य बाजारपेठांमध्ये महिलांसाठी ई-टॉयलेट उभारण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.
सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री रणजीत पाटील, श्रीमती कल्पिता पिंपळे, शहर अभियंता श्री संजय कांबळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री अनिल तानपुरे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) श्री अमोल कुलकर्णी, उपायुक्त श्रीमती अपर्णा भेटे तसेच उप अभियंता (मालमत्ता विभाग) श्री संजय चामले आदी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सभापती यांचा हायड्रोलिक पार्किंगसाठी व महिलांसाठी ई-टॉयलेट उभारणीवर भर
Related Posts
Add A Comment

