छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. समीर राजूरकर, उपमहापौर मा. श्री. राजेंद्र जंजाळ तसेच मा. आयुक्त श्री. अमोल येडगे सर यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 07/04/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, आरोग्य विभाग व आय.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये आज दिनांक 07/04/2026 महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक 1, 2 व 3 मधील एकूण 143 सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमात महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी तसेच आय.एम.ए. मधील तज्ज्ञ डॉक्टर फिजिशियन, नेत्ररोग, त्वचारोग, अस्थिरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व आवश्यक रक्त तपासण्या तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत छातीचे एक्स-रे तपासणी करण्यात आली.
तपासणीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: एकूण तपासणी केलेले कर्मचारी = 143
* फिजिशियन तपासणी :- 51 रुग्ण ( उच्च रक्तदाब- 11, मधुमेह- 12 )
* नेत्ररोग तपासणी :- 120 रुग्ण ( मोतीबिंदू- 15, इतर नेत्ररोग- 105 )
* त्वचारोग तपासणी :- 19 रुग्ण
* अस्थिरोग तपासणी :- 31 रुग्ण
* छातीचे एक्स-रे (Chest X-ray):- 62
* रक्त तपासणी:- 248 (रक्तगट- 68, Sickle Cell- 25)
तसेच, शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत 35 कार्ड व 50 कर्मचाऱ्यांचे ABHA कार्ड काढण्यात आले.
सदर उपक्रमांतर्गत उर्वरित झोननिहाय आरोग्य तपासणी पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे:
दिनांक 08/04/2026: झोन क्रमांक 4,5 व 6
दिनांक 09/04/2026: झोन क्रमांक 7, 8, 9 व 10.
या शिबिराद्वारे सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होऊन त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

