छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरीये यांनी आज दिनांक 07 एप्रिल रोजी सिद्धार्थ उद्यानाला भेट देऊन येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर पाहणी केली.
पाहणीदरम्यान सुरू असलेली कामे दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.
नागरिकांना स्वच्छ, सुसज्ज व सर्व सुविधा उपलब्ध असलेले उद्यान मिळावे, यासाठी आवश्यक सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
तसेच उद्यान परिसरात नव्याने उभारण्यात आलेले स्वच्छतागृह पुढील दोन दिवसांत नागरिकांसाठी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सिद्धार्थ उद्यानातील विकासकामांची अनिल मकरीये यांची पाहणी; दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश
Related Posts
Add A Comment

