छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरीये यांनी आज दिनांक 07 एप्रिल रोजी झोन क्र. 5 व 6 अंतर्गत येणाऱ्या विविध प्रभागांना भेट देऊन स्थानिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान नालेसफाई व कचरा व्यवस्थापन या बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करत संबंधित यंत्रणेला तात्काळ व नियमित साफसफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच झोन क्र. 7 येथेही प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील नालेसफाई व कचरा संकलन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची वेळेवर व योग्य पद्धतीने सफाई होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी प्रभागातील नगरसेवक, संबंधित अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
नालेसफाई व कचरा व्यवस्थापनावर भर, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांची झोन 5, 6 व 7 मध्ये पाहनी.
Related Posts
Add A Comment

